आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या नावी राहणार 2015 हे वर्ष, शाहरुखसोबत होणार टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतत शुटिंमध्ये व्यस्त असलेल्या सलमान खानचे यंदा तीन सिनेमे थिएरमध्ये झळकरणार आहेत. आमिर खानने सध्या कोणताही सिनेमा साइन केलेला नसल्याने तो 2015मध्ये फक्त शुटिंग करणार आहे. कदाचित यंदाच्या ख्रिसमसची रिलीज डेट सलमानच्या खात्यात येऊ शकते. शाहरुखच्या तीन सिनेमांची घोषणा झाली आहे. परंतु त्यांची रिजील डेट अद्याप ठरलेली नाहीये. त्यामुळे असे जाणवते, की या दोन्ही स्टार्स पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देऊ शकतात.
साजिड नाडियाडवाला यांच्या 'किक'ची शुटिंग शेवटच्या टप्यात असून सलमान त्यानंतर सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली बनवल्या जाणा-या 'प्रेम रतन धन पायो' आणि ऑगस्टपासून 'नो एंट्री'च्या सिक्वलमध्ये काम करण्यास सुरूवात करणार होता. परंतु आता त्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 'नो एंट्री में एंट्री'ची शुटिंग आता जानेवारी 2015मध्ये सुरू होणार आहे.
सुत्राच्या सांगण्यानुसार, सप्टेंबरचा स्लॉट सलमानने 'एक था टायगर' फेम दिग्दर्शक कबीर खानला दिला आहे. सूरज बडजात्या यांच्या सिनेमासोबतच तो बीइंग ह्यूमन प्रॉडक्शन खाली तयार होणा-या कबीरच्या सिनेमाची 70 दिवसांची शुटिंग करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. पारंपरिक पध्दतीने दिर्घकाळ शुटिंग करणारे बडजात्या जवळपास 200 दिवसांच्या शुटनंतर दीवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सलमानच्या आणि इतर सिनेमांविषयी...