आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan To Host Arpita Khan’S Wedding Reception In Mumbai

मुंबईत होणार सलमानच्या बहिणीचे जंगी वेडिंग रिसेप्शन, बॉलिवूडकरांची जमेल मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : अर्पिता खान आणि सलमान खान)
मुंबई- सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खानचे लग्न येत्या 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दिल्लीस्थित आयुष शर्मासोबत हैदराबादमधील फलकनुमा पॅलेस या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्पिता बोहल्यावर चढणार आहे. या लग्नात वधू-वराच्या कुटुंबीयांसमवेत जवळची काही मित्रमंडळी सहभागी होणार आहे.
आता बातमी आहे, की सलमानने आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाची जंगी रिसेप्शन पार्टी मुंबईत आयोजित करण्याचे ठरवले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता आणि आयुषचे वेडिंग रिेसेप्शन 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या रिसेप्शनला संपूर्ण फिल्म इंडस्ट्री सहभागी होणार आहे.
हैदराबादमध्ये रंगणा-या लग्नसोहळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन, विजय, चिरंजीवी, वेंकटेश आणि सुरेश बाबु यांच्यासह बी-टाऊनमधून आमिर खान, अजय देवगन, करीना कपूर खान, सैफ अली खान, अक्षय कुमार आणि सुभाष घई सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सलमानने शाहरुख खानलासुद्धा लग्नासाठी आमंत्रित केले आहे. आता शाहरुख लग्नाला उपस्थिती लावणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.