आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन, हृतिक, आमिरनंतर आता सलमान साकारणार \'धूम 4\'मध्ये व्हिलन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खान यशराज प्रॉडक्शनच्या 'धूम' सीरीजच्या पुढच्या भागात झळकण्याची शक्यता आहे. ऐकिवात आहे, की 'धूम 4'मध्ये सलमान व्हिलन साकारणार आहे. 'धूम' सीरीजच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुस-या भागात हृतिक रोशन आणि तिस-या भागात आमिर खानने व्हिलन साकारला होता. आता आदित्य चोप्रा 'धूम 4'साठी सलमानच्या नावाचा विचार करतोय.
आदित्य चोप्रा 'धूम 4'मध्ये स्टारडम आणि लोकप्रियतेत आमिर खानच्या तोडीस तोड असलेला अभिनेता घेऊ इच्छितो. त्यामुळे त्याने सलमान खानला या सिनेमात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 'धूम 3' या सिनेमात आमिरने नकारात्मक भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडित नवा विक्रम प्रस्थापित केला. भारतात 'धूम 3' ने 260 कोटी आणि जगभरात 560 कोटींचा व्यवसाय केला होता.
एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, यशराज बॅनर 'धूम 4'च्या तयारीत लागले असून सर्वकाही जुळून आल्यास सलमान व्हिलनच्या भूमिकेत सिनेमात झळकेल. अद्याप अभिनेत्रीच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाहीये. 'धूम 3'मध्ये आमिरसह कतरिना कैफने स्क्रिन शेअर केली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 'धूम' सीरीज आणि यशराज फिल्म्ससोबत असलेल्या सलमानच्या कनेक्शनविषयी...