आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडला केलेल्या मारहाणीपासून ते हिट अँड रन प्रकरणापर्यंत, जाणून घ्या सलमानचे 13 वाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेली अकरा वर्षे या ना त्या कारणांनी खटला लांबवत ठेवणारा चित्रपट अभिनेता सलमान खान मंगळवारी तीन साक्षीदारांच्या जबाबामुळे अडचणीत आला. 2002 मधील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने न्यायालयात त्याला ओळखले असून सलमाननेच आमच्या अंगावर गाडी घातल्याचे त्याने न्यायमूर्तींना सांगितले. त्यामुळे सलमान चांगलाच अडचणीत आला आहे.
काय आहे साक्षीदारांची साक्ष -
मुंबई सत्र न्यायालयात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ‘अपघात घडला त्यावेळी सलमान खान गाडी चालवत होता. अपघातानंतर सलमान पळून गेला, अशी साक्ष मुन्नू शेख याने दिली. दुसरा साक्षीदार मुसिलम शेख याने गाडी नंबर, काचा आणि बंपर याची माहिती दिली. तर तिसरा साक्षीदार संबा गौडा यानेही सलमानला अ‍ोळखले. हे तिघेही सलमानच्या टोयाटो लँड क्रूझ गाडीखाली जखमी झाले होते.
मंगळवारी सलमानचे वकील अ‍ॅड. शिवदे यांनी तीनही साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. आता पुढील सुनावणी 19 मे रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण ?
28 सप्टेंबर 2002 रोजीच्या रात्री दोन वाजता वांद्रे येथील हिल रोडवर सलमानच्या भरधाव गाडीने पदपथावर झोपलेल्या पाच कामगारांना चिरडले होते. यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. यापूर्वी हा खटला वांद्रे येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्यापुढे चालू होता. उच्च् न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यावर सलमानच्या वकिलांनी हा खटला नव्याने चालवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर हा खटला मुंबई सत्र न्यायालयात नव्याने चालवण्यात येत आहे.
या अपघातप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये सलमान दोषी ठरल्यास त्यास दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. आज झालेल्या तिघा साक्षीदारांच्या जबानीने सरकार पक्षाची बाजू मजबूत झाल्याचे मानण्यात येते.
सलमान आणि वाद हे तसे पाहता जुने समीकरण आहे. सलमान आता जेवढा बदलला आहे, तेवढाच पूर्वी तो रागीट आणि वादग्रस्त होता. ऐश्वर्याबरोबरचे अफेअर असो, अंडरवर्ल्ड डॉनबरोबरचे संबंध असो, शूटिंगच्या ठिकाणी उशीरा पोहोचणे असो, किंवा मनमौजी पद्धतीने काम करणे असो, या सर्व सलमानच्या वाईट बाजू होत्या. प्रत्येकाला सलमानचा भूतकाळ ठाऊक आहे. शिवाय इंडस्ट्रीत इतर अभिनेत्यांबरोबर भांडण करणं हे सलमानसाठी नवीन नाही.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान खानच्या आत्तापर्यंतच्या सर्व मोठ्या वादांबद्दल सांगत आहोत. यामध्ये त्याच्या रिलेशनशिपपासून ते करिअर आणि खासगी आयुष्यापासूनते काळवीट शिकारपर्यंतच्या प्रत्येक कॉन्ट्रव्हर्सीचा समावेश आहे.