आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FBवर सलमान झाला किंग, टि्वटरवर शाहरुखची उडवली जातेय टिंगल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खानच्या फेसबुक प्रोफाइलचे प्रिन्ट शॉट आणि त्याच्या चाहत्यांचे टि्वट)
मुंबई: सलमान खान सोशल साइट्सवर सध्या लोकप्रिय झाला आहे. फेसबुकवर 19 लाखांपेक्षा जास्त लाइक्स सलमानच्या पेजला मिळाले आहेत. याचे निमित्त करून सलमानचे चाहते शाहरुखची खिल्ली उडवत आहेत. कारण शाहरुखला त्याच्या चाहत्यांमध्ये किंग खान नावानेदेखील ओळखले जाते.
फेसबुकवर 19 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळवल्यानंतर #19MillionSalmaniacsOnFB टि्वटवरवर तो ट्रेंडवर आहे. फेसबुकवर बिग बी यांचे 14 लाखांपेक्षा जास्त तसेच शाहरुख खानच्या खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आहेत. सलमानने 19 लाख लाइक्स मिळवल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी टि्वटरवर टि्वट करण्यास सुरुवात केली आहे. या टि्वट्समध्ये सलमानला बॉलिवूडचा खरा किंग खान म्हणून संबोधले जाऊन शाहरुखची खिल्ली उडवली जात आहे. शाहरुखचे चाहतेदेखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानच्या चाहत्यांनी केलेले काही टि्वट्स...