आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Gossips: फोटोग्राफर्सच्या बहिष्कारानंतर आता पर्सनल फोटोग्राफर ठेवणार सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सलमान खान)
मुंबई - फोटोग्राफर्स आणि स्टार्स यांच्यातील वाद तसं पाहता जुनाच आहे. एकेकाळी अनुपम खेर, अमिताभ बच्चन आणि सलमान खानने प्रेसला बॅन केले होते. याचे कारण होते प्रेस आणि कलाकारांमधील मतभेद. आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडेच श्रद्धा कपूरवर छायाचित्रकारांनी बहिष्कार घातला होता, तेव्हा श्रद्धाने आपली चुक कबूल करत छायाचित्रकारांची माफी मागतली होती. हे प्रकरण संपत नाही तोच आता सलमान खान आणि छायाचित्रकारांमध्ये वादाला तोंड फुटले आहे.
आगामी 'किक' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान काही छायाचित्रकार अगदी अंगावर येऊन त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा सलमानच्या बॉडीगार्ड्सनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे संतापलेल्या छायाचित्रकारांनी सलमानकडून माफीची मागणी करत त्याच्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली. मात्र सलमानने त्यांची माफी मागण्यास नकार दिला. उलट तोच त्यांच्यावर भडकला आहे.
सलमानने आता पर्सनल फोटोग्राफरची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानच्या मते, छायाचित्रकारांची जेवढी गरज त्याला आहे, तेवढीच गरज त्यांना त्याची आहे. त्यामुळे आता हा वाद निवळण्याऐवजी वाढतच जाईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
आता सलमानने स्पष्ट केले, की मीडिया छायाचित्रकारांकडून तो छायाचित्रे काढून घेणार नाही, उलट आता तो आपल्या खासगी फोटोग्राफरची नियुक्त करणार आहे. खासगी छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग तो 'किक'च्या प्रमोशनसाठी करणार आहे. एकंदरीतच आता छायाचित्रकार आणि सलमान यांच्यातील वाद कोणते वळण घेणार हेच पाहायचंय.
कशावर आधारित आहे आगामी 'क्रिएचर'चे मुख्य पात्र?, कोण आहे इमरान हाश्मीची आवडती अभिनेत्री?, सोनाक्षीला न आवडणारा ऋतू कोणता?, परिणीती कुणासह काम करु इच्छित नाही? आणि कुणाचे दारुडे वडील होणार आहेत जॅकी श्रॉफ?, बॉलिवूडमधील हे सर्व इनसाइड गॉसिप्स जाणून घ्या पुढील स्लाइड्समध्ये....