आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान करणार ‘हीरो’च्या पोस्टरचे डिझाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान चांगला पेंटरदेखील आहे. कदाचित हा पहिला सिनेमा असेल ज्याचे सलमान स्वत: पोस्टर डिझाइन करेल..
जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्रीच्या ‘हीरो’चा रीमेक याच नावाने सलमान खान प्रॉडक्शन्सद्वारे बनवण्याचे काम सुरू आहे. या सिनेमाद्वारे सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. सलमान स्वत: कोअर टीमसोबत मिळून सिनेमाच्या मार्केटिंगची आणि प्रमोशनची तयारी करत आहे.
सलमान सिनेमाच्या काही पोस्टरचे स्वत: डिझायन करणार आहे. ‘लव्ह थीम’वर आधारित असलेला हा सिनेमा पुढच्या वर्षीच्या व्हॅलेंटाइन डेला रिलीज होणार आहे. साजिदने आपल्या ‘हीरोपंती’मध्ये टायगर श्रॉफ आणि कृतिसेनला यशस्वीरीत्या लाँच केले होते. त्यामुळे सलमान साजिद नाडियाडवालाकडूनही काही खास टिप्स घेत आहे.