आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने जॅकलीन आणि क्रू मेंबर्ससह साजरी केली 'किक'ची Wrap up पार्टी, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅप-अप पार्टीत केक कापताना जॅकलीन, सोबत सलमान खान आणि क्रू मेंबर्स)
मुंबई - सुपरस्टार सलमान खानचा आगामी 'किक' सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या महिन्यात म्हणजे 25 जुलै रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याने सर्व क्रू मेंबर्स आणि स्टारकास्ट खूप एक्साइटेड आहे. अलीकडेच हा आनंद साजरा करण्यासाठी रॅप अप पार्टीचे आयोजन सिनेमाच्या सेटवर करण्यात आले होते.
मुंबईत आयोजित या पार्टीत सलमान खान, सिनेमातील लीड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिस, को-स्टार रणदीप हुड्डा, दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला, त्यांची पत्नी वरदा नाडियाडवाला आणि सर्व क्रू मेंबर्स सहभागी झाले होते.
संपूर्ण टीमने यावेळी केक कापून सेलिब्रेशन केले. या केकवर 'congratulation Team Kick' असे लिहिण्यात आले होते. या सिनेमाद्वारे निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या सिनेमाची पटकथा चेतन भगत यांनी लिहिली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'किक'च्या रॅपअप पार्टीची खास छायाचित्रे...