मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 'किक' रिलीज होऊन आढ दिवस उलटत आहे. मात्र फोटोग्राफर्स यांच्या वतीने त्याच्या घालण्यात आलेला बहिष्कार तसाच सुरु आहे. फोटोग्राफर्स आणि सलमान दोघांना हे प्रकरण सोडवण्याची इच्छा दिसत नाहीये. नुकताच, सलमान त्याच्या मित्र कमल सदानाचा पहिलाच दिग्दर्शित सिनेमा लाँचिग इव्हेंटमध्ये पोहोचला होता. त्यावेळी फोटोग्राफर्सनी सलमानचा एकही फोटो क्लिक केला नाही.
फोटोग्राफर्सनी का केले बॅन?
फोटोग्राफर्स सलमानच्या आगामी 'किक'च्या 'डेव्हिल' गाण्याच्या लाँचिंगमध्ये पोहोचला होता. मुंबईमध्ये एका नाइटक्लबमध्ये 11 जुलै रोजी सलमानच्या बाउंसर्सनी काही फोटोग्राफर्सना धक्काबुक्की केली. त्यानंतर नाराज फोटोग्राफर्सनी सलमानचे बायकॉट करण्याचा निर्णय घेतला. इव्हेंटमध्ये सलमानचे फोटो काढण्यासाठी थोडी जागा देण्याची मागणी फोटोग्राफर्सनी केली होती. मात्र फोटोग्राफर्सना सहयोग करण्याऐवजी आयोजकांनी त्यांना एब्यूज केले. एवढे सर्व होऊनदेखील सलमान खानने प्रकरण सोडवण्याऐवजी म्हणाला, 'इव्हेंटमध्ये ज्यांना थांबायचे आहे त्यांनी थांबा अन्यथा जाऊ शकता.'
पुढे वाचा... सलमानने टि्वटरवर काय प्रतिक्रिया दिली...