आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan’S Fan Designer Abid To Gift His Aayush A Diamond Studded Sherwani

सलमानच्या चाहत्याने बनवली हिरेजडीत शेरवानी, आयुषला करणार गिफ्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शेरवानीसोबत आबिद)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिचे लग्न बी टाऊनमधील शाही लग्नसोहळ्यांपैकी एक ठरणार आहे. अर्पिता आणि आयुषच्या आयुष्यातील हा दिवस खास बनवण्यासाठी खान कुटुंबीयांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाहीये. या खास दिवशी अर्पिता कोणता ड्रेस परिधान करणार याविषयी बरेच काही लिहिले गेले आहे, मात्र नवरदेवाच्या आउटफिटविषयी क्वचितच बोलले गेले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला नवरदेव आयुषच्या वेडिंग आउटफिटविषयी सांगत आहोत. अभिनेता सलमान खानचे मोठे चाहते असलेले हैदराबादमधील प्रसिद्ध डिझायनर आबिद यांनी खान कुटुंबाचा जावई आयुषसाठी हिरेजडीत शेरवानी तयार केली आहे. या शेरवानीची किंमत जवळजवळ 50 लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ही हिरेजडीत शेरवानी आबिद आयुष शर्माला भेट म्हणून देणार आहेत.
मुळचे हैदराबादमधील असलेले आबिद सलमान खानचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी सलमानच्या होणा-या भावोजींसाठी ही हिरेजडीत शेरवानी तयार केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आयुषसाठी तयार करण्यात आलेल्या हिरेजडीत शेरवानीची खास झलक...