(डावीकडून (समोरच्या रांगेत) हेलन, सलमा, सीमा, निर्वाण, अयान, अरहान, सलीम खान आणि एलिजा. (मागील बाजूस) सोहेल खान, अतुल अग्निहोत्री, अलवीरा, सलमान खान, योहान, अर्पिता, अरबाज खान आणि मलायका अरोरा खान)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता
सलमान खानचे कुटुंब सध्या अर्पिता खान हिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता येत्या 18 नोव्हेंबर रोजी बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. हैदराबादमध्ये अर्पिताचा शाही लग्नसोहळा होणार आहे.
तसे पाहता
सलमान खानच्या कुटुंबातीन अनेक सदस्यांना त्याचे चाहते ओळखतात. या कुटुंबातील अनेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. मात्र सल्लू मियाँच्या कुटुंबातील काही सदस्य पडद्यामागे राहणे पसंत करतात. उदाहरणार्थ, सोहल खानची पत्नी सीमा खान आणि सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता यांचा सिनेमांशी प्रत्यक्ष नाते नाहीये. हे सलमानच्या कुटुंबातील ते सदस्या आहेत, जे नेहमी पडद्यामागे राहून
आपल्या कुटुंबाला पाठिंबा देत असतात.
सलमानचे वडील सलीम खान आपल्या काळातील प्रसिद्ध पटकथा लेखक होते. त्यांनी त्यांचे मित्र जावेद अख्तर यांच्यासह मिळून अनेक हिट सिनेमांची कथा लिहिली आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीने शोले हा गाजलेला सिनेमा भारतीय सिनेसृष्टीला दिला. मात्र त्यानंतर काही मतभेदांमुळे ही जोडी तुटली आणि नंतर दोघांचे मार्ग विभक्त झालेत.
अर्पिता खान हिच्या लग्नाच्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला सलमान खानच्या कुटुंबात कोणकोण आहेत, ते सांगत आहोत.
पुढील स्लाईड्मध्ये जाणून घ्या इंडस्ट्रीतील या खान कुटुंबातील सदस्यांविषयी...