आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan\'s \'Kick\' To Hit Over 4400 Screens, Widest Release Ever

रेकॉर्ड बनवण्यासाठी सलमानच्या KICKला करावा लागणार आज 36 कोटींचा बिझनेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किक'चे पोस्टर...)

मुंबई - बॉलिवूडमध्ये 'भाई जान' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'किक' हा सिनेमा 25 जुलै रोजी रिलीज झाला. या सिनेमात सलमानने ग्रे शेड भूमिका साकारली आहे. अर्थातच सिनेमात सलमान व्हिलनच्या रुपात झळकेल. सिनेमातील सलमानच्या भूमिकेचे नाव 'डेविल' आहे.
साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित आणि निर्मित हा सिनेमा 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'किक' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. सलमानसह सिनेमात जॅकलिन फर्नांडिस, नवाजुद्दीन सिद्दीकी, रणदीप हुड्डा आणि मिथून चक्रवर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा भारतासह तब्बल 42 देशांमध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी, मोरक्को आणि मालदीव यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. हा सिनेमा भारतात तब्बल 4400 तर परदेशात 700 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे.
आमिरचा रेकॉर्ड मोडित काढणार का सलमान खान?
बॉक्स ऑफिसवर सलमानने कमाईचे अनेक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्याचे मोठे सिनेमे ईदच्या मुहूर्तावरच रिलीज झाले आहेत. यावर टाकुया एक नजर...
वर्ष सिनेमा स्‍क्रिन पहिल्या दिवसाची कमाई (कोटींमध्ये)
2009 वॉन्‍टेड 1400 5.2
2010 दबंग 1900 15.10
2011 बॉडीगार्ड 2800 21.40
2012 एक था टाइगर 3400 32.9
2013 ईदच्या मुहूर्तावर रिलीज नाही. (जानेवारी रिलीज झालेला 'जय हो' फ्लॉप ठरला.)
2014 किक 4400 ------
* खरं तर ओपनिंग डेला सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड आमिर खानच्या 'धूम 3'च्या नावी आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई केली.
का बघावा 'किक'...
- सलमान खान पहिल्यांदाच ग्रे शेडच्या भूमिकेत झळकतोय.
- श्रीलंकन ब्युटी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच सलमानसह काम करतेय.
- सलमानने सिनेमातील काही गाण्यांना स्वतः आवाज दिला आहे.
- बी टाऊनचा टॅलेंटेड अॅक्टर म्हणून ओळखला जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच सलमानसह स्क्रिन स्पेस शेअर करतोय.
- स्क्रिनप्लेसाठी लेखक चेतन भगतने मदत केली.
- ब्रिटीश ब्युटी नर्गिस फखरीने या सिनेमातील एक डान्स नंबर केला आहे.
- सिनेमात श्वास रोखून धरणारे अॅक्शन सीन्स आहेत. पोलंडमधील सर्वात उंच इमारतीच्या 40व्या मजल्यावरुन सलमानने उडी घेतली. त्या सीनची बरीच चर्चा होतेय.
- सिनेमातील संवाद विशेष गाजू शकतात. यापूर्वीसुद्धा सलमानचे बॉडीगार्डमधील 'मुझ पर एक एहसान करना', वॉन्‍टेडमधील 'एक बार जो कमिटमेंट कर दिया' हे संवाद बरेच लोकप्रिय ठरले.
- निर्माता साजिद खान यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'हाउसफुल', 'हे बेबी', 'हाउसफुल 2', 'हाईवे', 'हीरोपंती', 'टू स्‍टे्टस' यांसारख्या यशस्वी सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे.
का बघू नये किक ...
- सलमान खानचा आणखी एक मसाला सिनेमा म्हणून याकडे बघता येईल. सिनेमाकडून उत्कृष्ट अभिनयाची अपेक्षा घेऊन जाणार असाल तर जाऊ नका.
- सिनेमाचे संगीत खास नाहीये. 'जुम्मे की रात...' या गाण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही गाण्याची विशेष चर्चा झालेली नाही.
- अॅक्शन सीन्सचा ओव्हरडोज पसंत नसल्यास जाऊ नका.
- 48 वर्षीय सलमान खानला सुपरहीरोच्या रुपात बघू इच्छित नसाल, तर सिनेमा बघू नका.
- जॅकलिन फर्नांडिससारख्या नवोदित अभिनेत्रीला बघू इच्छित नसाल, तर सिनेमा बघू नका.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा: 'किक'चे पोस्टर, सीन्स, शूटिंगदरम्यानची छायाचित्रे, ट्रेलर आणि गाणे...