मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार
सलमान खानची आई सलमा खान यांनी आपले वजन कमी करण्यासाठी अलीकडेच बेरियाट्रिक सर्जरी केली आहे. या सर्जरीनंतर त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसत आहेत. डॉ. मुफ्फजल लकडवाला यांनी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली.
सलमा खान मुंबईतील व्हाय. बी. चवन सेंटर CODS (सेंटर फॉर ओबेसिटी एंड डाइजेस्टिव सर्जरी)च्या कॅलेंडर लाँचमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी त्या पूर्वीपेक्षा खूप स्लिम दिसत होत्या. या कार्यक्रमात सलमान त्यांच्यासह मुलगी अलविरा अग्निहोत्री, मुश्ताक शेख, गायक रुप कुमार राठोड यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनाली राठोड आणि मुलगी रीवा राठोड हे उपस्थित होते.
बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय?
बेरियाटिक सर्जरीमध्ये शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी केली जाते. यासाठी डॉक्टर विविध प्रकारे उपचार करतात. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे पोटाचा आकार कमी करणे. यामुळे रुग्णाची भूक कमी होती. परिणामी भविष्यकाळात त्याचे वजन कमी होण्यास मदत होते.
कोण आहेत सलमा खान?
सलमान खान यांचे खरे नाव सुशीला चरक आहे. लेखक सलीम खान यांच्या त्या पहिल्या पत्नी आहेत. 1964मध्ये दोघांचे लग्न झाले. या दाम्पत्याला एकुण तीन मुले आणि एक मुलगी आहे. सलमान, अरबाज आणि सोहेल ही त्यांच्या मुलांची तर अलविरा हे मुलीचे नाव आहे. अलविराचे लग्न दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीसह झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शस्त्रक्रियेनंतरची सलमा खान यांची काही छायाचित्रे...