('प्रेम रतन धन पायो'च्या शूटिंगदरम्यान क्रिकेट खेळताना सलमान खान)
मुंबई: सूरज बडजात्याचा 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमात
सलमान खानसोबत सोनम कपूरसुध्दा दिसणार आहे. या सिनेमात सलमान दुहेरी भूमिका साकारत असल्याचे कळते. तो त्यामध्ये एक राजा आणि एक सामान्य व्यक्ती असेल.
मात्र, सूत्रांच्या सांगण्यानुसार, सलमानने सिनेमाचे शूटिंगमध्येच थांबवले आहे, याच्या मागे एक कारण आहे. कबीर खानसोबत तो दुसरा सिनेमा करत असल्याचे समजते. कबीरच्या सिनेमाचे शूटिंग हिवाळ्यात दिल्लीमध्ये होणार आहे. हे शूटिंग हिवाळ्यात झाली नाही तर शूटिंग एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात येऊ शकते. त्यामुळे सलमानने 'प्रेम रतन धन पायो'चे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. सलमानने सूरज यांच्यासोबत 'हम
आपके है कौन' आणि 'मैने प्या किया' सिनेमा केला आहे.
'प्रेम रतन धन पायो'चे शूटिंगदरम्यान स्टार्सचा लूकसुध्दा समोर आला आहे. सलमान सिनेमात एका राजाच्या पात्रात आहे. त्याचीदेखील छायाचित्रे समोर आली आहेत. हिरव्या रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाची पगडीमध्ये तो दिसत आहे. त्याच्याबोत सोनम कपूर आणि नील नितिन मुकेश दिसत आहे. शूटिंगदरम्यान फावल्या वेळेत सलमानने क्रिकेट खेळण्याचा फंडा शोधून काढला. याचीही छायाचित्रे समोर आली. त्यामध्ये सलमान बॉलिंग करताना दिसला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंग दरम्यान स्टार्सचा लूक आणि सेटवरील छायाचित्रे...