(पती आयुष शर्मासोबत अर्पिता खान)
मुंबईः अभिनेता
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान सध्या
आपल्या पतीसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. अर्पिता आणि आयुष शर्मा येथे आपला हनीमून साजरा करण्यासाठी आले आहेत. त्यांनी आपल्या या रोमँटिक हॉलिडेजची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत.
या छायाचित्रांमध्ये आयुष आणि अर्पिता एन्जॉय करताना दिसत आहेत. काही छायाचित्रांमध्ये हे दोघे आपल्या मित्रांसोबतही दिसत आहेत.
18 नोव्हेंबर रोजी अर्पिता दिल्लीचा रहिवाशी असलेल्या आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकली. हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा न्यूयॉर्क येथील आयुष आणि मित्रांसोबतची अर्पिताची छायाचित्रे...