( (1)- अर्पिताचा गृहप्रवेश (2)- मेंदी लावून घेताना अर्पिता (3) आयुषला वरमाला घालताना अर्पिता)
मुंबईः मंगळवारी रात्री बॉलिवूड अभिनेता
सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता लग्नाच्या गाठीत अडकली. अर्पिताचे लग्न बॉलिवूडमधील भव्य लग्नांपैकी एक होते. या लग्नात बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
शाहरुख खान,
आमिर खान,
प्रियांका चोप्रा,
कतरिना कैफ, करण जोहर, कबीर खान, किरण राव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावून अर्पिता आणि आयुषला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
येत्या 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये रिसेप्शन होणार आहे. शुक्रवारपासून अर्पिताच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झआली होती. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला अर्पिताच्या गृहप्रवेशापासून सुरु झालेल्या विधींपासून ते लग्नाच्या विधीपर्यंतची सर्व छायाचित्रे दाखवत आहोत. अर्पिताचा लग्नापूर्वीच गेल्या शुक्रवारी गृहप्रवेश झाला होता.
शुक्रवारः गृहप्रवेश
शुक्रवारी नवी दिल्लीत आयुष शर्माच्या घरी सुपरस्टार
सलमान खानच्या बहिणीचा गृहप्रवेश करण्यात आला. खरं तर लग्नानंतर वधूचा गृहप्रवेश केला जातो. मात्र सलमानच्या बहिणीचा लग्नापूर्वीच गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी आयुष शर्माच्या घरी खान फॅमिलीसाठी डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती.
रविवारः मेंदी आणि हळद
गेल्या रविवारी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अर्पिताचा मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गॅलेक्सी अपार्टमेंटला फुले आणि रोशनाईने सजवण्यात आले होते.
रविवारः संगीत सेरेमनी
अर्पिताची संगीत सेरेमनी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये ठेवण्यात आली होती. संगीत सेरेमनीत
शाहरुख खानने हजेरी लावली होती.
मंगळवारः विवाह
मंगळवारी संध्याकाळी हैदराबादमध्ये अर्पिता आयुषसोबत लग्नगाठीत अडकली. या लग्नात फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताच्या गृहप्रवेशापासून ते लग्नापर्यंतची निवडक छायाचित्रे...