आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan’S Special Preparations For Ganesh Chaturthi

Pics : गणेश पूजेच्या तयारीला लागला सलमान खान, भक्तीत असा होतो लीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : बहीण अर्पितासह सलमान खान)
मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरी दरवर्षी गणरायाचे आगमन होत असते. गेल्यावर्षी घराचे नुतनीकरण झाल्याने गणपतीचे आगमन सलमानची बहीण अलवीराच्या घरी झाले होते. मात्र यंदा गॅलेक्सी अपार्टमेंटस्थित आपल्या घरी सलमान गणपतीची स्थापना करणार आहे. यासाठी सलमानने विशेष तयारीदेखील सुरु केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणरायाच्या आगमनासाठी सलमान खूप उत्सुक आहे. यावर्षी त्याच्या 'किक' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सलमान मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. सलमान स्वतः सर्व तयारीकडे जातीने लक्ष देतोय.
एका प्रसिद्ध पंडिताकडून तो महाआरती करुन घेणार असल्याचेही समजते. सलमानच्या घरी दीड दिवसासाठी गणरायाचे आगमन होत असते. पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करुन गणपतीला निरोप दिला जातो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा गणेश भक्तीत कसा लीन होऊन जातो सलमान खान...