मुंबई - बॉलिवूड अभिनेता
सलमान खानची लाडकी बहीण बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्व काही जुळून आल्यास अर्पिता तिच्या दिल्ली स्थित बॉयफ्रेंडसोबत 2015मध्ये लग्नगाठीत अडकेल. दोघांच्याही कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेतली असून त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे.
अर्पिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आयुष शर्मा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता आणि आयुष या नात्याविषयी गंभीर आहेत. आयुष एका प्रतिष्ठित श्रीमंत कुटुंबातील असून त्याचे कुटुंबीय अर्पिताला पसंत करतात. लवकरच त्यांचा साखरपुडा करण्याच्या विचारात त्यांचे कुटुंबीय आहेत. आयुषची अभिनेता होण्याची इच्छा असून सध्या तो याची तयारी करतोय.
अलीकडेच आयुषने अर्पितासोबतचे आपले एक छायाचित्र
ट्विटरवर पोस्ट केले आणि त्याखाली ट्विट केले, ''अर्पिता माझ्या आजुबाजुला असली की मला बोअर होत नाही.''
हे आहेत अर्पिताचे मागील बॉयफ्रेंड्स -
आयुषपूर्वी अर्पिता दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड निहार पंड्यासोबत डेट करत होती. निहारनंतर तिच्या आयुष्यात अर्जुन कपूरची एन्ट्री झाली होती. दोघांचे रिलेशन जवळजवळ दोन वर्षे टिकले, मात्र नंतर स्वतः अर्पिताने अर्जुनसोबतच्या नाते संपुष्टात आणले. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अर्जुनने स्वीकारले होते, की एकेकाळी तो अर्पितासोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता.
सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे अर्पिता -
अर्पिता सलीम खान यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. सलीम खान यांनी हेलनसोबत दुसरे लग्न केल्यानंतर त्यानी अर्पिताला दत्तक घेतले होते. हेलन आणि सलीम खान यांना संतान नाहीये, त्यामुळे त्यांनी अर्पिकाला दत्तक घेतले. आता ती खान कुटुंबातील सदस्य असून सर्वजण तिच्यावर खूप प्रेम करतात. विशेषतः सलमान खानची ती खूप लाडकी आहे. सलमान अनेकदा अर्पिताला पार्टीत सोबत घेऊन जातो. इतकेच नाही तर सलमानच्या कोर्ट ट्रायलवेळीसुद्धा अर्पिता त्याच्यासोबत कोर्टात जात असते.
पुढील स्लाईड्मध्ये पाहा आयुष शर्मासोबतची अर्पिताची छायाचित्रे...