(छायाचित्रेः ताज लँड्स अँड आणि इनसेटमध्ये सलमान-अर्पिता)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. हैदराबादमधील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नाचे स्थळ निश्चित झाल्यानंतर आता वेडिंग रिसेप्शनसाठी सलमानने मुंबईतील हॉटेल ताज लँड्स अँड या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलची निवड केली आहे. हे संपूर्ण हॉटेल एका दिवसासाठी बूक करण्यात आले आहे. हैदराबादमधील हॉटेलप्रमाणेच खान कुटुंबाने हॉटेल ताज लँड्स अँडमधील केवळ हॉल बूक न करता संपूर्ण हॉटेलच एका दिवसासाठी भाड्याने घेतले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खान कुटुंबाला अर्पिताच्या लग्नासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवायची आहे. त्यासाठी त्यांनी संपूर्ण फलकनुमा पॅलेस बूक केले. असेच त्यांनी हॉटेल ताजसंदर्भातसुद्धा केले. 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी संपूर्ण ताज हॉटेल बूक करण्याची प्रक्रिया खान कुटुंब पूर्ण करत आहे. या रिसेप्शन पार्टीत खान कुटुंबियांनी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांव्यतिरिक्त दुसरे कुणीही प्रवेश करु शकणार नाही. इतकेच नाही तर खान कुटुंब हा सोहळा खासगी ठेवणार आहे, त्यामुळे मीडियालासुद्धा या इव्हेंटपासून दूर ठेवण्यात आले आहे.
रिसेप्शनला फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच अनेक राजकारणी, बिझनेसमनसुद्धा सहभागी होणार आहेत. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेकडे
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा लक्ष देत आहे. इव्हेंटमध्ये सहभागी होणा-या पाहुण्यांना कडक सुरक्षेतून जावे लागणार आहे.
वांद्रास्थित हॉटेल ताज लँड्स अँड मुंबईतील एलीट क्लासची पहिली आवड आहे. यापूर्वी
आमिर खानचा भाचा इमरान खान आणि अवंतिकाची रिसेप्शन पार्टी याच ठिकाणी झाली होती. याशिवाय रितेश-जेनेलिया देशमुख यांचीही रिसेप्शन पार्टी येथेच झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हॉटेल ताज लँड्स अँडची खास छायाचित्रे...