आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman shahrukh khan who wins the race to play kamal hassans role?

कमल हसनच्‍या भूमिकेवरून पुन्‍हा रंगणार 'खान वॉर'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या बॉलिवूड टॉलिवूडवरच अवलंबून आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्‍दर्शक गौतम मेनन लवकरच 'वेट्टाइयाडू विलाइयाडू' या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहेत. मूळ चित्रपटातील कमल हसनची गाजलेली भूमिका शाहरूख खान आणि सलमान खान यांच्‍यापैकी कुणा एकाला मिळेल अशी चर्चा आहे.
दाक्षिणात्‍य चित्रपटांचा हिंदी रिमेक म्‍हणजे 'सुपरहिटच' असे समीकरणच जणू बनले आहे. त्‍यामुळे रिमेकमध्‍ये काम मिळवण्‍यासाठी इतर कलाकारांप्रमाणेच सुपरस्‍टारही धडपडत असतात. सध्‍या शाहरूख आणि सलमान दोघेही या चित्रपटातील मुख्‍य भूमिकेच्‍या श्‍ार्यतीत पाय रोवून उभे आहेत. कमल हसनने मूळ चित्रपटात एका यशस्‍वी पोलिस अधिका-याची भूमिका साकारली होती. त्‍याची ही भूमिका दाक्षिणात्‍य रसिकांनी डोक्‍यावर घेतली होती. त्‍यामुळे साहजिकच हिंदी रिमेकमधील कमलची भूमिका मिळवणे शाहरूख- सलमानसाठी प्रतिष्‍ठेची बाब बनली आहे.
याआधी सलमानने अशा प्रकारची भूमिका साकारली आहे. सलमानची 'गर्व', 'वॉंटेड' तसेच 'दबंग'मधील पोलिस अधिका-याची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. त्‍यामुळे सलमानचे पारडे अधिक जड आहे, असे म्‍हणायला हरकत नाही.
हिंदी रिमेक बनवून बॉलिवूडमध्‍ये शिरण्‍यासाठी गौतमकडे ही चांगली संधी आहे. या संधीचे गौतम सोने करतो की माती हे लवकरच समजेल. तसे पाहता, शाहरूख किंवा सलमान दोघांपैकी कुणीही चित्रपटात असेल तरी त्‍यांच्‍या नावावरच चित्रपट पहिला आठवडा तरी हमखास चालतो; त्‍यामुळे गौतमच्‍या पदरी निराशा येणार नाही हे निश्चित.
पण चित्रपटातील मुख्‍य भूमिकेसाठी शाहरूख की सलमान यांपैकी कुणाची वर्णी लागणार हे पाहाणे जास्‍त औत्‍सुक्‍याचे आहे.