आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने विद्यार्थ्यांना शिकवला आदराचा धडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानची ओळख मोठय़ांचा आदर करणार्‍या अभिनेत्यांच्या रूपात आहे. तो आपल्या पालकांचाच नाही तर निर्मात्यांचाही आदर करतो. एवढेच नाही तर त्यांच्या नावासोबत 'जी' लावूनच बोलतो. उदा. सुभाषजी (सुभाष घई), बोनीजी (बोनी कपूर), रमेशजी (रमेश तोरानी) इत्यादी.
त्याचे असे झाले की, सलमानला गेल्या आठवड्यात घईंना भेटायला जायचे होते. तो त्यांच्या व्हिस्लिंग वूड्स शाळेत पोहोचला. तथापि, सलमान तब्बल तीन महिन्यांनंतर येथे आला होता. त्यामुळे त्याला शाळेचा संपूर्ण परिसर दाखवायचा, असा घईंनी विचार केला. फिरत असताना समोरील सोफ्यावर बसून गप्पा मारणार्‍या त्या चार विद्यार्थ्यांवर सलमनाची नजर गेली. घई आणि सलमान तेथून जात असताना हे विद्यार्थी तेथेच बसून होते. त्यांनी कोणाचाही आदर केला नाही. यामुळे सलमानला राग आला. तो लगेच त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला 'उभे राहा. सुभाषजी माझ्यासमोर येतात तेव्हा मी उभा राहून त्यांचा आदर करतो. हे तुमचे वरिष्ठ आहेत, प्राचार्य आहेत आणि तुम्ही त्यांचा अनादर करत आहात?' घईंनी सलमानला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी दोघांचीही माफी मागितली.