आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक हॉलिवूड सिनेमांची कॉपी आहे सलमान खानचा 'किक', पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायचित्र 'आयरन मॅन 3' या हॉलिवूड सिनेमातील असून त्याखाली दिलेले छायाचित्र सलमानच्या 'किक' या सिनेमाच्या ट्रेलरमधून घेण्यात आले आहे.
मुंबई - ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी सिनेमा 'किक' हॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमांतील सीन्स चोरुन बनवण्यात आला आहे. असे आम्ही नाही, तर सिनेमाचा ट्रेलर बघून स्पष्ट दिसत आहे. इतकेच नव्हे तर दिग्दर्शकांने हे सीन्स हुबेहुब उचलले आहेत, जे प्रेक्षकांच्या सहज लक्षात येऊ शकतील. 'किक'मध्ये हॉलिवूडमधील आयरन मॅन 3, मिशन इम्पॉसिबल, स्कायफॉल, फँटास्टिक आणि डार्क नाइट हेयर या सिनेमातील सीन्सची जशीच्या तशी कॉपी करण्यात आली आहे.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये होणारी हॉलिवूडची नकल ही तशी जुनी परंपरा आहे. अनेकदा सिनेमांचा प्लॉट चोरला जातो, तर कधी सीन्स चोरुन दिग्दर्शक आपल्या सिनेमात देसी अंदाजात सामाविष्ट करुन घेतात. काही वर्षांपूर्वी आलेला भट्ट कॅम्पचा 'मर्डर' हा सिनेमा 'बेसिक इंस्टिंक्ट' या अमेरिकन सिनेमाची कॉपी होता. या सिनेमाची संपूर्ण थीमच भट्ट कॅम्पने चोरली होती. त्यानंतर प्रेरणा घेऊन सिनेमा बनवला असल्याचे स्पष्टीकरण भट्ट कॅम्पने दिले.
अशीच कॉपी सलमानच्या 'किक'मध्येही करण्यात आली आहे. 'किक'च्या केवळ 2 मिनिटे 43 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये चक्क आठ सीन्सची हॉलिवूडमधून कॉपी करण्यात आली आहे. हे सीन सलमान खान, रणदीप हुड्डा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहेत. केवळ ट्रेलरमध्येच दिग्दर्शक साजिद नाडियावाला यांनी हॉलिवूड सिनेमांची कॉपी करण्याचा रेकॉर्ड मोडला आहे, तर जरा विचार करा पूर्ण सिनेमात त्यांनी किती सीन्स चोरले असतील. एकंदरीतच सलमानचा 'किक' हा सिनेमा हॉलिवूडची कॉपी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
पुढील स्लाईड्समध्ये छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा कशी 'किक' या सिनेमात हॉलिवूडची कॉपी करण्यात आली आहे.