मुंबई: सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या लग्नाच्या तारिखेची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 16 नोव्हेंबर रोजी ती बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की अर्पिता आणि आयुषचे लग्न जानेवारी 2015मध्ये होणार होते. मात्र आता बातमी आली आहे, की दोघांच्या लग्नाची तारीख 16 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. हैदराबादच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य समारंभात दोघे
विवाह बंधनात अडकतील. दोघांच्या कुटुंबाच्या साक्षीने हे लग्न पार पडणार आहे. या समारंभात बॉलिवूडमधून कोण-कोण उपस्थित राहणार हे पाहणेदेखील रंजक ठरणार आहे.
सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे अर्पिता
अर्पिता ही सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. सलीम यांनी हेलन यांच्याशी दुसरे लग्न केल्यानंतर अर्पिता खान कुटुंबात आली होती. हेलन आणि सलीम साहेब यांना मुल नसल्याने त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते. तेव्हापासून ती खान कुटुंबाची सदस्य बनली आणि
सर्व कुटुंबीय तिच्यावर जिवापाड प्रेम करतात.
विशेष म्हणजे, सलमान तिला सर्वात जास्त जिव लावतो. तो कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात अर्पिताला आवर्जुन सोबत नेतो. एवढेच नव्हे, सलमान तिला कोर्टातील तारखांवेळीसुध्दा अर्पिताला घेऊन जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत अर्पिताची काही छायाचित्रे...