आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015मध्ये सलमानची बहीण अडकणार लग्नगाठीत, भावाने घेतली बॉयफ्रेंडच्या कुटुंबीयांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान बहीण अर्पितसह
मुंबई: 'दबंग खान' त्याच्या कामात कितीही व्यस्त असला तरी कुटुंबीयांना वेळ देण्यास विसरत नाही. सध्या खान कुटुंबातील सर्वात लहान सदस्य बहीण अर्पिताच्या लग्नाची तयारीत जोरात सुरु आहे. सलमानच्या बहीणचे लग्न पुढील वर्षी अर्थातच 2015मध्ये होणार आहे.
अर्पिता मागील काही महिन्यांपासून आयुष शर्मासह डेट करत आहे. आयुष दिल्लीचा रहिवासी असून अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आला होता. सलमानने नुकतीच त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये एका पार्टीचे आयोजन केले. पार्टीचा उद्देश बहीण अर्पिताच्या सासरच्या लोकांना भेटण्याचा होता. खान कुटुंबीयांनी पहिल्यांदाच शर्मा कुटुंबीयांची औपचारिरित्या भेट घेतली. पार्टीत साजिद नाडियाडवालासुध्दा उपस्थित होते. पार्टीतले जेवण
सलमानची आई सलमा यांनी स्वत: तयार केले होते.
सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे अर्पिता:
अर्पिता सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. सलीम खान आणि हेलन यांचे लग्न झाल्यानंतर त्यांनी अर्पिता लहान असताना तिला दत्तक घेतले होते. तेव्हापासून ती खान कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याप्रमाणे राहते आणि सर्व कुटुंबीय तिचे खूप लाड करतात. सलमान कोणत्याही पार्टीत किंवा इव्हेंटमध्ये अर्पिताला सोबत घेऊन जातो. एवढेच काय, कोर्टातील तारखांच्या वेळीसुध्दा अर्पिता सलमानच्या सोबत असते.
बॉयफ्रेंड आयुष शर्मासह अर्पिताची खास छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...