आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1st Wedding Anniversary Of Sameera Reddy And Akshai Varde

Wedding Ann: मराठमोळ्या वर्देंच्या घरची सून आहे समीरा, लवकरच होणार आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल छायाचित्रेः संगीत आणि लग्नसोहळ्यातील समीरा-अक्षयची झलक)

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आणि बाइकविश्वात 'वर्देंची मोटारसायकल' हा ब्रँड नावारूपाला आणणारा मराठमोळा तरुण उद्योजक अक्षय वर्दे यांनी नुकताच आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. 21 जानेवारी 2014 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले होते.
अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. अडीच वर्षांपूर्वी अक्षय आणि समीरा रेड्डी संपर्कात आले होते. या ओळखीचे रुपांतर पहिले मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले आणि त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. समीरा आणि अक्षयसाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ड्रेस डिझाईन केले होते.

घोड्यावर नव्हे बाइकवर स्वार होऊन आला होता नवरदेव...
लग्न म्हटलं की नवरदेव घोड्यावरुन येणार हे सर्वसाधारण चित्र असतं. मात्र समीराचा नवरदेव अर्थातच अक्षय याला अपवाद ठरला होता. कारण अक्षय घोड्यावर नव्हे तर बाइकवर स्वार होऊन विवाहस्थळी पोहोचला होता.

लवकरच आई-बाबा होणारेय समीरा-अक्षय...
लग्नानंतर समीरा रेड्डीने करिअरमध्ये थोडासा ब्रेक घ्यायचा ठरवले. सध्या ती संसारात छान रमलीय आणि आता त्यांच्याकडे गोड बातमीही आहे. होय, समीरा लवकरच आई होणार आहे. हे दाम्पत्य त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी खूप उत्सुक आहेत.
अक्षय आणि समीराच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांचा वेडिंग अल्बम दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा या दोघांच्या आयुष्यातील खास क्षण...