(फाइल फोटोः साची कुमार आणि बिलाल अमरोही)
मुंबईः दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांची नात आणि अभिनेता कुमार गौरवची मुलगी साची अलीकडेच लग्नगाठीत अडकली. बॉयफ्रेंड बिलाल अमरोहीसोबत साचीने लग्न केले. साचीचा मामा अभिनेता संजय दत्त तुरुंगात असल्यामुळे अगदी छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कोण आहे साची कुमार
साची अभिनेता कुमार गौरवची मुलगी आणि राजेंद्र कुमार यांची नात आहे. तिच्या आईचे नाव नम्रता दत्त असून संजय दत्तची बहीण आहे. साची व्यवसायाने फॅशन डिझायनर असून स्वतःचे स्टोअर चालवते.
कोण आहे बिलाल अमरोही
बिलाल अमरोहीने याचवर्षी 'ओ तेरी' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले आहे. बिलाल प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा नातू आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा साची कुमार आणि बिलाल अमरोहीची निवडक छायाचित्रे...