आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच टेनिस स्टार सानिया मिर्झा 'बाँड गर्ल' झाली का? जाणून घ्या Real Story

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टेनिस स्टार सानिया मिर्झा)
'बाँड गर्ल' बनने हे एखाद्या अभिनेत्रीसाठी स्वप्नवत आहे. जर ही संधी एखाद्या खेळाडूला मिळाली तर... भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा याच बातमीमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. स्वतः सानियाने आपल्या ट्विटर अकाउंटवर बॉन्ड गर्लच्या ऑफरविषयी ट्विट केले होते. सानियाने ट्विट केले होते, की "आता प्रतिक्षा होत नाहीये. ‘BONDing’सोबत पुढे पाऊल टाकत आहे. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे." यावरुन तिला हॉलिवूडची ऑफर मिळाली असावी, असा अंदाज सर्वत्र वर्तवला गेला होता.
मात्र सत्य काही वेगळेच आहे. सानियाला हॉलिवूडची ऑफर मिळालेली नसून ती सोनी पिक्स या वाहिनीच्या नवीन प्रमोशनल सीरीजसाठी अभिनय करत आहे. या वाहिनीचे अनेक नवीन कार्यक्रम सुरु होणार असून त्यामध्ये बॉन्ड सिनेमांचा समावेश आहे. जेम्स बाँडचा एक टीव्ही कार्यक्रम सानिया प्रमोट करणार आहे. याची माहिती स्वतः सानियाच्या वडिलांनी दिली आहे.
सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी स्पष्ट केले, की सानिया बाँड सिनेमात अॅक्टिंग करणार नसून ती जेम्स बाँडचा एक टीव्ही प्रोग्राम प्रमोट करणार आहे. यासाठी सानियाने एक खास फोटोशूटसुद्धा केले आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाथ गोवारीकर यांनी हे फोटोशूट केले आहे.
हैदराबाद मीडियात मागील काही दिवसांपासून सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या ग्रॅण्ड वेडिंगसोबत सानिया मिर्झाची ही बातमी चर्चेत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सानिया मिर्झाची शूटिंगदरम्यानची छायाचित्रे आणि सोबत पाहा तिचे ट्विट्स...