(फाइल फोटो: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त)
अभिनेता संजय दत्त तुरुंगात जाण्यापूर्वी पर्यंत
आपल्या एका सिनेमासाठी कोटींच्या घरात मानधन घेत होता. मात्र आता तुरुंगात त्याला दिवसभराच्या श्रमानंतर 50 रुपये पगार मिळत आहे.
तुरुंगात जाण्यापूर्वी संजय दत्तने 25 कोटींची एक विदेशी कार खरेदी केली होती. मुंबईतील काही निवडक श्रीमंतांकडे ही कार आहे. लग्झरी आयुष्य व्यतित करणारा संजय आता मात्र तुरुंगात दिवस काढत आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या संजयकडे कागदी पिशव्या बनवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या कामाच्या मोबदल्यात त्याल दर दिवसाला 50 रुपये मिळतात. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार 15 रुपयांनी वाढला आहे.
बेकायदा शस्त्र बाळगणे या गुन्ह्याखाली संजय दत्तला न्यायालायनं 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजय दत्तने आधीच 18 महिन्यांची शिक्षा भोगली होती. आणि उर्वरीत 42 महीने शिक्षा संजय दत्त पुण्याच्या येरवडा जेलमध्ये भोगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बॉलिवूडमधील आणखी काही रंजक बातम्या..