आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay dutt returns thanedaar returns signing amount

संजयने 'ठाणेदार रिटर्न्‍स'चे मानधन केले परत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड कलावंत नेहमीच एकमेकांची बरोबरी करताना दिसतात. मग ते सारखेच चित्रपट करण्‍याबाबत असो किंवा चित्रपटाच्‍या मानधनाबाबत असो. नुकतेच अभिनेता संजय दत्‍तने 'ठाणेदार रिटर्न्‍स' या बंद पडलेल्‍या चित्रपटाच्‍या निर्मात्‍यांना सायनिंग रक्‍कम परत देऊ केली आहे.
'सामी' या तमिळ सुपरहिट चित्रपटावर आधारित 'ठाणेदार रिटर्न्‍स' या चित्रपटासाठी संजयला करारबद्ध केले होते. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन के एस रवीकुमार आणि एस कुमार मोहन करणार होते. चित्रपटाची निर्मिती अतुल मोहन, धरम ओबेरॉय, व्‍ही के सिंग आणि पी जी श्रीकांत यांची होती. परंतु, चित्रपटाच्‍या हक्‍कावरून वाद निर्माण झाल्‍याने चित्रपटाचे चित्रीकरण बंद पडले. एका इंग्रजी वृत्‍तपत्रास दिलेल्‍या मुलाखतीत मोहन म्‍हणाले की, 'चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाल्‍याचे आम्‍ही संजयला सांगितले. त्‍याने मोठे मन दाखवत सायनिंग रक्‍कम परत केली. हक्‍काबाबत वाद मिटल्‍यावर या चित्रपटावर पुन्‍हा काम सुरू करण्‍याची आमची इच्‍छा आहे.'
'ठाणेदार रिटर्न्‍स' अ‍ॅक्‍शनवर आधारित असल्‍याने संजय दत्‍त खूप उत्‍साहात होता. भूमिकेनुसार, स्‍वत:मध्‍ये बदल करण्‍यास त्‍याने सुरूवात केली होती. तसेच, नियमित व्‍यायाम सुरू केला होता. परंतु, न केलेल्‍या कामाचे पैसे ठेवून घेणे संजयच्‍या मनास पटले नाही.
याआधी अभिनेता सैफ अली खानने 'श्री अष्‍टविनायक सिनेव्हिजन'ला एका चित्रपटासाठी तब्‍बल 11 कोटी रूपये परत केले होते. साडे तीन वर्षांनंतरही चित्रपटाचे प्रदर्शन होऊ न शकल्‍याने सैफने प्रामाणिकपणे मानधन परत केले होते.
संजय 'ठाणेदार रिटर्न्‍स'मध्‍ये दिसणार नसला तरी त्‍याच्‍या चाहत्‍यांनी निराश व्‍हायचे कारण नाही. कारण, सध्‍या संजय एका अ‍ॅक्‍शनपटाचे चित्रीकरण करत आहे. चित्रपटाचे नाव मात्र अद्याप ठरलेले नाही.