आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या मुलीचा फॅशन जगतात प्रवेश, पाहा निवडक 20 Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : त्रिशाला दत्त)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची थोरली मुलगी त्रिशाला दत्तने अलीकडेच आपली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेंशनची श्रृंखला सुरु केली. आता तिने पुन्हा एक पाऊल पुढे टाकले आहे. फॅशन डिझायनर अमिता बलसोबत तिने हाय अॅण्ड फॅशन मॅगझिन सुरु केले आहे.
त्रिशालाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॅशन जगतात नवीन परिभाषा मांडण्यासाठी या दोघी उद्योजिका उत्सुक आहेत. त्रिशाला आणि अमिता यांच्यात ब-याच गोष्टीत साम्य आहे. दोघीही भारतीय वंशाच्या असून त्या अमेरिकेत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत.
त्रिशाला आणि अमिताच्या या फॅशन मॅगझिनच्या काही भागांचे फोटोशूट 23 जून रोजी पार पडले. अमिताने हे फोटोशूटचे डायरेक्शन आणि स्टाइल केले. तर हेअरस्टाइलिंगची जबाबदारी त्रिशालाने सांभाळली. पुढील महिन्यात लॉस एंजिलिसमध्ये पुढील फोटोशूट पार पडणार आहे.
संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे त्रिशाला..
त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. अमेरिकेत आपल्या आजीआजोबांकडे त्रिशाला लहानाची मोठी झाली. 1987मध्ये संजयचे ऋचा शर्मासोबत लग्न झाले होते. 1996मध्ये कॅन्सरमुळे ऋचाचे निधन झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा त्रिशाला दत्तची निवडक 19 छायाचित्रे...
नोट - सर्व छायाचित्रे इंटरनेटवरील विविध माध्यमांमधून घेण्यात आली आहेत...