आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt’S Four Year Old Daughter Hospitalized

संजय दत्तची मुलगी रुग्णालयात दाखल, पुन्हा पॅरोलवर बाहेर येऊ शकतो \'मुन्ना भाई\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो: मुलगी इकरासह मान्यता दत्त
मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मात्र, त्याच्यासाठी एक वाईट बातमी आहे. त्याची मुलगी इकरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहे. सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे, इकराला लिव्हर इन्फेक्शनमुळे या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर चार-पाच दिवसांपासून उपचार सुरु आहे.
संजयची पत्नी मान्यता दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याला पॅरोलवर तुरुंगातून काही महिन्यांची सुटी मिळाली होती. आता मुलगी आजारी असल्याने यावेळीसुध्दा त्याला सुटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वेळी अशी चर्चा रंगली होती, की मान्यता आजारी नसून संजयला तुरुंगाच्या बाहेर वेळ घालवता यावा म्हणून हे नाटक करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टानेसुध्दा जाब विचारला होता, की संजय दत्त तुरुंगाच्या बाहेर एवढा वेळ कसा राहू शकतो?
आता संजय पुन्हा पॅरोलसाठी अर्ज करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. मुलगी आजारी असून कुटुंबीयांना त्याची गरज आहे असे कारण दाखवून संजयचे वकील कोर्टात सुटीची मागणी करू शकतात. आता संजयला पुन्हा पॅरोलवर सुटी मिळते की नाही हे येत्या काही दिवसांत दिसून येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या संजय दत्तला आतापर्यंत कितीदा मिळाले पॅरोल...