आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sanjay Dutts Uncle And Bollywood Actor Somdutt Died

संजय दत्तचे काका सोमदत्त यांचे निधन, राष्ट्रीय पुरस्कारावर उमटवली होती मोहोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः संजय दत्तचे चुलत भाऊ युवराज यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नि दिला.)
यमुनानगरः प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचे धाकटे बंधू आणि संजय दत्तचे काका सोमदत्त यांचे रविवारी पहाटे निधन झाले. यमुनानगर (उत्तर प्रदेश) येथील मंडोली गावात सोमदत्त वास्तव्याला होते. दीर्घ काळापासून ते आजारी होते. 77 वर्षीय सोमदत्त यांचे चंदीगड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रविवारी संध्याकाळी यमुना घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा युवराज दत्त यांनी त्यांना मुखाग्नि दिला. बुधवारी त्यांचे अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे.
सोमदत्त यांनी एकुण 22 सिनेमांमध्ये अभिनय केला होता. 1969 मध्ये आलेल्या 'मन का मीत' आणि 'नानक नाम जहाज' या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारने गौरविण्यात आले होते. सोमदत्त यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. थोरली मुलगी नंदिता इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून धाकटी मुलगी ममता पंजाबमधील अमृतसर येथे असते. तर मुलगा युवराज आई प्रोमिलासोबत मंडोली येथे राहतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोमदत्त आणि त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...