आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Hinduja Danced In Their Marriage Jennifer Lopez Perform

स्वतःच्या लग्नात वधूसोबत थिरकले संजय हिंदुजा, जेनिफर लोपेजचा धमाकेदार परफॉर्मन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर संजय हिंदुजा आणि वधू अनु मीरचंदानी थिरकताना, जेनिफर लोपेजने केले परफॉर्म)
उदयपूरः हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष संजय हिंदुजा आणि डिझायनर अनु मीरचंदानी (मेहतानी) यांच्या लग्नात हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर जेनिफर लोपेजने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. या शाही लग्नात जगभरातील 800 व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी झाले. या लग्नासाठी उदयपूर येथील लेक पॅलेस, उदय विलास, लीला पॅलेस, रेडिसन, शिव निवास पॅलेस, फतह प्रकाश पॅलेस, ट्रायडेंट हॉटेल बूक करण्यात आले आहेत.
गुरुवारी संध्याकाळी चार वाजता विलास पॅलेसच्या पिछोला किना-याहून गणगौर नावेतून वर-वधू जग मंदिरात पोहोचले. आकर्षक सजावट करण्यात आलेल्या 14 नावेतून सर्व वराती लग्नस्थळी दाखल झाले. सर्व पाहुण्यांसाठी इंडियन ट्रेडिशनल ड्रेस ही वेडिंग थीम होती. पुरुषांनी ब्लॅक अँड व्हाइट कोट परिधान केले होते. तर सर्व महिला ट्रेडिशनल लूकमध्ये होत्या. उदयविलास पॅलेसहून जगमंदिरात पोहोचलेल्या वरातीचे वधू पक्षाने पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. फोक म्युझिक आणि शहनाईच्या सूरात वर-वधू मंडपात आले.
हे सेलिब्रिटी झाले सहभागी...
बिझनेस टायकून आणि हॉलिवूड-बॉलिवूडमधील अनेक दिग्गक मंडळी या लग्नात सहभागी झाले. गुरुवारी फरदीन खान, रवीना टंडन, स्वामी चिन्मयानंद उदयपूरमध्ये दाखल झाले. यापूर्वी सोहेल खान, सीमा सचदेव, शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा, डिनो मोरिया, संजय कपूर, लव सिन्हा, ऋतु कपूर, श्रद्धा कपूर, शफी चौधरी, मनीष मल्होत्रा, उद्योगपति लक्ष्मी निवास मित्तल, गौतम अडानी, वेदांताचे अनिल अग्रवाल, सुशील बजाज, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल हे उदयपूरमध्ये पोहोचले होते. युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवोनी आणि सऊदी अरबचे शेख रसल यांनीही या लग्नाला विशेष उपस्थिती लावली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा संजय हिंदूजा यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...