आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तेवर'च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचले अर्जुनसह हे सेलेब्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेता-निर्माता संजय कपूर)
मुंबई - अर्जुन कपूर गुरुवारी त्याच्या आगामी 'तेवर' या सिनेमाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. गोरेगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अर्जुनसह बी टाऊनचे आणखी काही सेलिब्रिटीसुद्धा दिसले.
अर्जुन या इव्हेंटमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने व्हाइट टीशर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. या सिनेमाचे निर्माते अर्जुन वडील आणि काका आहेत. बोनी कपूर आणि संजय कपूर या सिनेमाचे निर्माते आहेत. हे दोघेही या इव्हेंटमध्ये सामील झाले होते. अमित शर्मा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. मनोज वाजपेयी, मोहित मारवाह, दिग्दर्शक रजत रावेलसुद्धा अर्जुनला त्याच्या या सिनेमासाठी शुभेच्छा द्यायला आले होते.
'तेवर' हा 'ओकाडू' या साउथ सिनेमाचा रिमेक आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात
महेश बाबू आणि भूमिका चावला मेन लीडमध्ये होते. तर तेवरमध्ये अर्जुनसह सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे.
पुढे पाहा, या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...