आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मस्‍ती-2'मध्‍ये अजयची जागा घेणार संजय दत्‍त!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मस्‍ती' या चित्रपटात पोलिस अधिका-याची भूमिका साकारून तीन 'महाठकांना' वठणीवर आणणारा अजय देवगण आजही सर्वांच्‍याच लक्षात असेल. पण आता 'मस्‍ती'च्‍या सिक्‍वेलमध्‍ये मात्र अजयच्‍या जागी संजय दत्‍त दिसणार आहे.
सध्‍या 'अग्निपथ'मधील संजयचा 'कांचा' लूक प्रेक्षकांना खूप आवडतोय. त्‍यामुळे संजयच्‍या याच प्रसिद्धीचा फायदा 'मस्‍ती'च्‍या सिक्‍वेलसाठी करून घ्‍यावा असा विचार निर्माता इंद्र कुमारने केला असावा. म्‍हणूनच, संजयच्‍या तारखा मिळवण्‍यासाठी इंद्र कुमार सध्‍या धडपडत आहे.
'मस्‍ती-2'मध्‍ये संजयला पोलिस अधिकारी म्‍हणून न दाखवता एका वेगळ्याच आणि हटके भूमिकेत दाखवण्‍याचा इंद्र कुमारचा मानस आहे. ही भूमिका कोणती असेल हे मात्र अद्याप समजले नाही. सध्‍या तरी संजय 'इंद्रावर' प्रसन्‍न होतो का तेच पाहायचे.