आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanskruti Balgude Ready For Debut In Marathi Films

संस्कृतीची ‘सांगतो ऐका’मधून होणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री, पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो -संस्कृती बालगुडे)

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘पिंजरा’ या मालिकेतील ‘आनंदी’ची भूमिका साकारणारी तसेच 'विवाह बंधन' यासारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे आता मोठ्या पडद्यावरील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘सांगतो ऐका’ आणि ‘शॉर्टकट’ या लागोपाठ येणा-या मराठी सिनेमांमधून संस्कृती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे.
सतीश राजवाडे आणि सचिन पिळगावकर यांचा आगामी ‘सांगतो ऐका’ हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यामध्ये संस्कृती एका नृत्यांगनेची भूमिका साकारत असून ही नृत्यांगना नृत्यात अत्यंत प्रवीण असलेल्या पिळगावकर यांच्या प्रेमात पडते अशी या सिनेमाची कथा आहे. तर ‘शॉर्टकट’ या सिनेमामध्ये ती वैभव तत्ववादीबरोबर झळकणार आहे. हा सिनेमा हॅकिंग, सायबर गुन्हेगारी यावर आधारित आहेत.
मुळची पुण्याची असलेली संस्कृती वयाच्या सातव्या वर्षापासून भरतनाट्यम शिकत आहे. भरत नाट्यमच्या चार परीक्षा तिने दिल्या आहेत. 12वीपासून वेस्टर्न डान्स शिकायला तिने सुरुवात केली. त्यांनतर काही डान्स शो केले. स्वित्झर्लंड, मॉरिशिअस आणि फ्रान्स येथे तिने डान्स शोसुद्धा केले आहेत. ती भरतनाटयम शिकली असल्याने ‘सांगतो ऐका’मधील भूमिका तिला ऑफर करण्यात आल्याचे समजते. संस्कृतीला तिच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

या पॅकजमधून आम्ही तुम्हाला संस्कृतीची ग्लॅमरस अदा दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेल्या प्रेक्षकांच्या लाडक्या संस्कृतीचा ग्लॅमरस अवतार...

फोटो साभार - फेसबुक