आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sapna Pabbi To Debut From Bhatt Camp Film Khamoshiyan

भट्ट कॅम्पमधून होणार सपनाची बोल्ड एंट्री, अनिल कपूरसोबत केले आहे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये एक नवीन एंट्री होणार आहे. अनिल कपूरच्या '24' या टीव्ही शोमध्ये त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसलेली सपना पब्बी महेश भट्ट यांच्या 'खामोशिया'मधून बोल्ड अवतारात एंट्री करणार आहे. मात्र, यापूर्वी तिने पदार्पण म्हणून सुजीत सरकारच्या '17 को शादी है' सिनेमा साइन केला होता. परंतु आता 'खामोशिया' पहिले रिलीज होणार आहे.
अलीकडेच, सिनेमा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 28 वर्षीय सपना ब्रिटीश मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. ती अर्जुन रामपालसोबत गॅलक्सी चॉकलेट्स, क्रिकेटर विराट कोहलीसोबत पेप्सी आणि यामी गौतमसोबत फेअर अँड लव्हली जाहिरातीमध्येसुध्दा दिसली आहे.
बातमी आहे, की तिने विशेष फिल्म्स (भट्ट कॅम्प)सोबत 3 सिनेमांचा करार साइन केला आहे. पहिल्या खामोशिया सिनेमात तिचा बोल्ड अवतार दिसणार आहे. त्यामध्ये तिच्यासोबत टीव्ही स्टार गुरमीत चौधरी आणि अभिनेता अली फजल दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सपना पब्बीची ग्लॅमरस छायाचित्रे...