आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमा आगा यांची मुलगी साशा कुटुंबाच्या मनाविरुध्द गुपचुप अडकली लग्नगाठीत?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: साशा आगा
मुंबई: बातमी आहे, की मागील वर्षी 'औरंगजेब'मधून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी पाकिस्तानी-ब्रिटीश अभिनेत्री साशा आगाने म्यूझिक कंपोझर सचिन गुप्तासह लग्नगाठीत अडकली आहे. दोघांचे लग्न खूपच गुपितरित्या पार पडले आहे. तसेच साशाची आई सलमा आगा यांच्या मनाविरुध्द झाले आहे. मात्र, साशा या बातम्यांचे खंडन करते. एका प्रसिध्द वर्तमानपत्रानुसार, 4 जुलै रोजी साशाच्या आईने त्यांच्या लग्नाविषयी दुजोरा देण्याचा प्रयत्न केला मात्र साशाने या गोष्टीला नाकारत कॉलबॅक केला आणि सांगितले, की तिचे अद्याप लग्न झालेले नाहीये आणि तिची आई या नात्याच्या विरोधात नाहीये.
साशाची आई त्यांच्या नात्याच्या विरोधात नसल्याचा दावा ती करत असली तरी, मात्र काही वेळापूर्वीच्या बातम्या असाच इशारा करत आहेत. सलमा या साशा आणि सचिनच्या नात्याविषयी खुश नाहीये. मे महिन्यात सलमा यांनी सचिनच्या विरोधात मुंबई, ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तरीदेखील साशा आणि सचिन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला नाही.
अलीकडेच, साशाला विचारण्यात आले, की तिने तिच्या आईला या नात्याविषयी कसे समजावले? तिने उत्तर देताना सांगितले, 'ती कधीपर्यंत माझ्याशी नाराज राहू शकते. मी तिची चिंता समजू शकते. तिचे म्हणणे आहे, की आम्ही सध्या करिअरवर लक्ष द्यायला हवे. मात्र जेव्हा तिला आमच्या गंभीर नात्याची चाहूल लागली तेव्हा तिने होकार दिला. मी आणि सचिन एकमेकांना 6 वर्षांपासून ओळखतो. गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.'
जेव्हा सचिनला याविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले, 'साशा आणि मी एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो. ती खूप चांगली मुलगी आहे. आता सलमा अँटीसुध्दा आमच्या नात्याचा स्विकार केला आहे. परंतु अफवांवर विश्वास ठेऊ नका. आम्ही अद्याप लग्न केलेले नाही.'
लग्नाविषयी साशाचे म्हणणे आहे, 'सचिन कधी-कधी मला वाइफ म्हणून संबोधतो त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला असावा.'
अभिनेत्रीव्यतिरिक्त गायिका आहे साशा:
साशा बॉलिवूडमध्ये 80 आणि 90च्या दशकात आपल्या आवाजाने सर्वांचे मन जिंकणा-या सलमा आगा यांची मुलगी आहे. 2013मध्ये यशराज फिल्म्स 'औरंगजेब'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-या साशाने अर्जुन कपूरसह या सिनेमात काम केले होते. या रोमँटिक थ्रिलर सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी साशा अभिनेत्रीसह गायिकासुध्दा आहे. आपल्या पदार्पणाच्या सिनेमात तिने 'बरबादियां' हे गाणे गायले होते. सध्या ती दिग्दर्शक आनंद कुमार यांच्या 'देसी कट्टे'मध्ये काम करत आहे. सुनील शेट्टी आणि जय भानुशाली अभिनीत हा सिनेमा यावर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साशा आगाची 10 निवडक छायाचित्रे...