आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Rajwade Express His Views On Marathi Films And TV Serials

\'मालिका रटाळ होण्यामागे निर्मात्यांची पाल खेचून मगर करण्याची वृत्ती कारणीभूत\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकपुणे : हिंदी चित्रपट निर्मात्यांप्रमाणे मराठी निर्मात्यांनीसुद्धा मल्टीप्लेक्स मालकांशी एका वर्षासाठी प्रदर्शनासाठी करार करावा, तसे केल्यास दोघांनाही फायदा होईल, असे मत लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केले.

मराठी निर्माते आणि कलाकार यांना प्रसिद्धीचे वलय मिळावे यासाठी कॅफे कॉफी डेने लावुन्ज संकल्पना अंमलात आणली त्याचे कौतुक करून राजवाडे म्हणाले, की माझ्या चित्रपटाचे कथानक अशाच ग्लॅमरस गोष्टीशी जोडल्याने ते लोकप्रिय झाले. हल्लीच्या काळात अशी कॉफी लाउंज म्हणजे चालते फिरते ऑफिस बनले आहेत.

मराठी कलाकृतीला ग्लॅमर कोशंट नाही हे लक्षात घ्यायला हवे असे स्पष्ट करून ते म्हणाले, की एखादा चित्रपट तिकीट खिडकीवर तुफान चालला म्हणजे तो चांगला असे नाही आणि मराठी आणि हिंदीची तुलना योग्य नाही. जो चित्रपट होणे हे मला मृगजळ वाटत होते त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला हे 'मृगजळ'मुळे सिध्द झाले आहे. देव कुठेतरी आहे हेही मला उमजले. मराठी निर्मात्यांनी त्यासाठी बाजारपेठेचा नेमका कालावधी ओळखून चित्र प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

माझी आईपण बघते
टीव्हीवरच्या मराठी मालिका रटाळ असतात पण रिमोट आपल्या हातात असतो. मालिका किती ताणतात आणि वेड्यासारखे दाखवतात असे माझी आईपण म्हणते, परंतु मालिका पाहणे ती चालूच ठेवते. टीव्ही हा कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला हे त्याचे कारण आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. मालिका रटाळ होण्यामागे निर्मात्यांची वृत्ती ही पाल खेचून मगर करण्याची आहे अशी त्यांनी सांगितले.

सीसीडी विस्तार करणार
महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरात सीसीडी ला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून आणखी 8-10 नवीम कॉफी शॉप सुरु केली जाणार आहेत, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने यावेळी सांगितले. पुण्यात तीन लाउंज असून त्यांची संख्या आगामी काळात वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे. लवकरच मुंबईत कॉफी डे स्क्वेअर हा उच्चभ्रू वर्गासाठी असलेला ब्रांड सुरु केला जाणार असून चिकमंगळूर असो की ब्राझील मधील खास कॉफी, मागणीनुसार ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यातील काही कॉफी बिया आयात केल्या जाणार आहेत.