आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहनलाल करणार आमिरच्या ‘सत्यमेव जयते’चे प्रमोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील प्रत्येक भागात चांगला प्रतिसाद मिळावा या हेतूने ‘सत्यमेव जयते’ या आमिर खानच्या शोच्या दक्षिणेतील प्रमोशनाची जबाबदारी दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल याच्यावर सोपवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या शोच्या पर्वाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दक्षिणेत या शोच्या प्रमोशनसाठी मोहनलाल यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शोमध्ये मांडण्यात येणार्‍ या विविध विषयांवर मोहनलाल त्यांची भूमिका मांडणार आहेत. शोची संकल्पना अतिशय चांगली आहे. त्यामुळे याचा एक भाग बनण्याचा निर्णय घेतल्याचे मोहनलाल यांनी सांगितले.