आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Sizzler Wardha Khan In Bollywood New Hottie

NEW HOTTIE: साऊदी अरबची ही सेक्सी बाला दाखवणार आपला जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊदी अरबची ही हॉट बाला लवकरच बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे वर्धा खान असे आहे. मुळ साऊदी अरबची असलेली वर्धा जोआ मोरानी आणि इमरान जाहिदबरोबर आगामी 'मार्कशीट' या चित्रपटात झळकणार आहे.
याआधी वर्धाने राहत फहेत अली खानच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. शिवाय वर्धा अनेक मॅग्झिनच्या कव्हर पेजवरचा हॉट चेहरा राहिली आहे.
बॉलिवूडमध्ये परदेशी तरुणी केवळ आयटम नंबरपर्यंतच मर्यादित राहतात. मात्र बॉलिवूडमध्ये लांब पल्ला गाठायची वर्धाची इच्छा आहे. तसे पाहता तिला अनेक आयटम नंबर ऑफर झाले आहेत. मात्र आयटम नंबर करायला वर्धाने नकार दिला आहे.
बॉलिवूड इनिंग सुरु करणा-या वर्धाच्या 'मार्कशीट' दिग्दर्शक राकेश रंजन असून भारतीय शिक्षण व्यवस्थेवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.