आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मला सासू हवी\'मध्ये मोठा बदल, सविता प्रभूणेंनी घेतली आसावरी जोशींची जागा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'मला सासू हवी' या मालिकेत आता आलाय मोठा ट्विस्ट. घरात मायेचे छत्र असावे म्हणून मीराने आपल्या सासरेबुवांचे दुसरे लग्न लावून दिले आणि गायत्रीची घरात एन्ट्री झाली. मात्र अभिलाषा आणि कॅश या दोन सुनांच्या कट कारस्थानांना कंटाळून गायत्री घर सोडून निघून गेली आहे. घरातील सगळेजण तिचा शोध घेत आहेत. दर मंगळवारी देवघरातील दिवा लावण्याचा मान सासूबाईंचाच असतो. त्यामुळे या मंगळवारी दिवा लावण्यासाठी आपल्या सासूबाई घरी परततील अशा विश्वास मीरा वाटतोय. मीराचा हा विश्वास खराच ठरणार आहे. कारण येत्या मंगळवारी मीराच्या सासूबाई परतणार आहेत. हं पण या सासूबाई अभिनेत्री आसावरी जोशी नसून त्या सविता प्रभूणे असणार आहेत.

आसावरी जोशींऐवजी सविता प्रभूणे का ? हा बदल काही काळापुरता आहे का ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... तर याचे उत्तर म्हणजे हा बदल कायमस्वरुपी राहणार आहे. आता आसावरी जोशी यापुढे मालिकेत आपल्याला सासूबाईच्या भूमिकेत दिसणार नाहीयेत. त्यांच्याऐवजी आता सविता प्रभूणेंची वर्णी सासूबाईंची भूमिकेत लागली आहे.

हा बदल का झाला ? असाही प्रश्न तुमच्या मनात डोकावलाच असेल ना. याचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे आसावरी जोशी यांना या मालिकेत पुढे काम करणे शक्य होणार नसल्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले. मात्र हा मालिकेतील कोणता ट्विस्ट नसून निर्मात्यांचे आणि आसावरी जोशी यांचे बिनसले असल्याचे समजते. या मालिकेसाठी आसावरी जोशी पुरेसा वेळ देत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी सविता प्रभूणेंची निवड करण्यात आल्याचे समजते.

असो, आसावरी जोशी यांनी आपल्या दमदार अभिनय आणि लोभस रुपाने '...सासू'ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आता प्रेक्षक सविता प्रभूणेंनासुद्धा सासूच्या भूमिकेत पसंत करतील, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.