'खूबसुरत'चे दुसर पोस्टर
मुंबई: सोनम कपूरच्या आगामी 'खूबसुरत' सिनेमाचे दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. सोनमने तिच्या टि्वटर अकाउंटवर 'खूबसुरत'चे पोस्टर पोस्ट करून लिहिले, 'अपोजिट मीन्स सिजलिंग केमिस्ट्री...' सोनमने पुढे लिहिले अजून अताषबाजी होणे बाकी आहे...तुम्ही 'खूबसुरत'सह जोडून राहा.
'खूबसुरत'च्या दुस-या पोस्टरमध्येसुध्दा कलाकारांचे चेहरे दाखवले नाहीत. परंतु हे पहिले पोस्टरपेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे. त्यात तरुणाला आणि तरुणीला एकमेकांसमोर उभे दाखवण्यात आले आहे. पोस्टरमध्ये तरुणी रंगेबेरंगी लूकमध्ये असून तरुण कुर्ता-पायजमा आणि नेहरू कटच्या जॅकेटममध्ये साध्या लूकमध्ये दिसत आहे. अलीकडेच सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते.
सिनेमात सोनम कपूरसह पाकिस्तानी 'जिंदगी' चॅनलच्या टीव्ही शो 'जिंदगी गुलजार है' फेम फवाद खान दिसणार आहे. फवाद यापूर्वी पाकिस्तानच्या बहुचर्चित जिहादच्या मार्गाने चालणा-या तरुणाची कहानी रेखाटण्यात आलेल्या 'खुदा के लिए'मध्ये झळकला होता. 'खूबसुरत'मध्ये दोन विविध विचारांचे युवक असूनदेखील एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'खूबसुरत'चे पहिले पोस्टर ...