आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See How Ace Filmmaker Mahesh Bhatt Turns Photographer For His Nephew

...जेव्हा भाच्यासाठी फोटोग्राफर झाले महेश भट्ट, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महेश भट्ट आणि इमरान हाश्मी)
मुंबई- इमरान हाश्मी सध्या 'मिस्टर एक्स' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच तो अमायरा दस्तूरा, महेश भट्ट आणि विक्रम भट्ट यांच्यासोबत मुंबईच्या एका मॉलमध्ये सिनेमा प्रमोट करण्यासाठी गेला होता. इव्हेंटमध्ये निर्माते महेश भट्ट यांनी भाचा इमरान हाश्मी यांचे फोटो काढले.
'मिस्टर एक्स'ची टीम सिनेमाच्या स्ट्रॅटेजीशी निगडीत 'स्टंडी' लाँच करण्यासाठी पोहचली होती. येथे इमरान हाश्मी कॅज्युअल लूकमध्ये दिसला. तसेच अमायरा दस्तूर ब्लॅक टॉप आणि व्हाइट स्कर्टमध्ये स्पॉट झाली.
'मिस्टर एक्स' दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा सिनेमा असून मुकेश भट्ट यांनी निर्मित केला आहे. सिनेमात इमरानशिवाय अमायरा दस्तूर आणि अरुणोदय सिंहसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. 17 एप्रिल रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
कसे झाले मामा-भाचाचे नाते?

इमरान हाश्मीच्या वडिलांचे नाव अनवर हाश्मी आहे. ते अभिनेत्री पूर्णिमा दास वर्मा (खरे नाव महरबानो अली) यांचे पूत्र आहेत. तर पूर्णिमाची बहीण शिरीन मोहम्मद अली, या दिग्दर्शक महेश आणि मुकेश भट यांच्या आई आहेत. या नात्याने इमरान हाश्मी आणि मुकेश भट यांचा पुतण्या आहे. दिग्दर्शक मोहित सुरीसुद्धा इमरानचा भाऊ आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मिस्टर एक्स'च्या प्रमोशनमध्ये आलेल्या सेलेब्सचे फोटो...