आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CAUGHT: ‘वेलकम टू कराची’च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत अर्शद आणि जॅकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाचे शूटिंग करताना अर्शद वारसी)
मुंबईः ‘वेलकम टू कराची’ हा सिनेमा ब-याच काळापासून चर्चेत आहे. अभिनेता इरफान खानने शेवटच्या क्षणी सिनेमातून काढता पाय घेतला होता. मात्र आता इरफानच्या जागी जॅकी भगनानीची एन्ट्री सिनेमात झाली असून चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
divyamarathi.com तुम्हाला सिनेमाच्या शूटिंगचे ऑन लोकेशन फोटोज दाखवत आहे. चित्रीकरणाच्या फावल्या वेळेत अर्शद वारसी आणि जॅकी भगनानी सेटवर धमाल करताना कॅमे-यात कैद झाले.
‘वेलकम टू कराची’ हा सिनेमा आशिष आर. मोहन दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाची कथा दोन तरुणांभोवती गुंफण्यात आली असून ते चुकून विना पासपोर्ट कराचीत पोहोचतात. पुढे काय घडतं, हे सिनेमात बघणे इंट्रेस्टिंग ठरेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाच्या ऑन लोकेशनची झलक..