आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • See Pictures Of Sonam Kapoor With Sister Rhea Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहीण रिया आहे सोनम कपूरची बेस्ट फ्रेंड, पाहा या कपूर सिस्टर्सचे खास Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून रिया कपूर आणि सोनम कपूर)
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिची धाकटी बहीण रिया कपूर तिची बेस्ट फ्रेंड आहे. इतकेच नाही तर सोनमसाठी रिया तिची बिझनेस पार्टनर, फिलॉसॉफर आणि गाईडसुद्धा आहे. रिया असताना तिला इतर मित्रमैत्रिणींची कधी गजर भासली नाही.
अलीकडेच सोनमच्या आगामी 'खुबसूरत' या सिनेमाचे म्युझिक लाँच झाले. यावेळी रियासुद्धा तिच्यासोबत हजर होती. म्युझिक लाँच सोहळ्यात सोनमला रियासोबतच्या केमिस्ट्रीविषयी प्रश्न विचारला असता, ती म्हणाली, आम्ही दोघींनी यापूर्वी आयशा या सिनेमासाठी एकत्र काम केले होते. तेव्हा मी 23 तर रिया 21 वर्षांची होती. आता पाच वर्षांनी आम्ही दोघी पुन्हा एकत्र काम करत आहोत.
सोनमच्या म्हणते, की माझ्या आणि रियाच्या विचारांत बरेच अंतर आहे. मात्र दोन भिन्न स्वभावांच्या व्यक्तीत अंतर असू शकतं. आम्ही कामाच्या वेळी प्रोफेशनली वागतो. आमच्यातील बाँडिंग खूप स्ट्राँग आहे.
सोनम आता बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे, तर रियाला अभिनयात मुळीच रुची नाहीये. मात्र स्टाइलमध्ये दोघी बहिणी सारख्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनम आणि रिया कपूरची खास छायाचित्रे...