आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Aniv: बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री होती डिंपल कपाडियाची बहीण, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सिंपल कपाडिया)
डिंपल कपाडियाची बहीण सिंपल कपाडिया बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री होती. अनेक सिनेमांनंतर तिने तिले फॅशन डिझाइन मध्ये करिअर करणे पसंत केले. ती या क्षेत्रात यशस्वीसुध्दा झाली, परंतु 10 नोव्हेंबर 2009 रोजी कर्करोगाने तिचे निधन झाले.
वयाच्या 18व्या वर्षी सिंपलने अभिनेत्री म्हणून अभिनय क्षेत्राला सुरुवात केली. 1977मध्ये 'अनुरोध'मधून तिने पहिला अभिनय केला. त्यामध्ये तिचा को-स्टार राजेश खन्ना होते. त्यावेळी राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केलेले होते. 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सिंपलने लूटमार (1980), शाका (1981), परख (1981), दूल्हा बिकता नही (1982), हम रहे ना हम (1984), प्यार के दो पल (1986)सह अनेक सिनेमे दिले.
राजेश खन्ना-जिंतेद्रसोबत केला रोमान्स
'अनुरोध'मध्ये सिंपल राजेश खन्ना यांच्यासोबत रोमान्स करताना दिसली. त्यानंतर 'शाका' सिनेमात चॉकलेट अभिनेता जितेंद्र होते. छोट्या फिल्मी करिअरमध्ये सुपरस्टार्स शिवाय सिंपल शेखर सुमनसोबतसुध्दा काम करताना दिसली होती.
रुदालीसाठी केला ड्रेस डिझाइन
1987मध्ये फिल्मी करिअर सोडून सिंपलने फॅशन डिझाइन बनण्याचा निर्णय घेतला. त्यानेळी तब्बू, अमृता सिंह, श्रीदेवी आणि प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्री तिच्या क्लाइंट्स होत्या. 1994मध्ये 'रुदाली'साठी सिंपलने उत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाइनरचा नॅशनल अवॉर्ड जिंकला. शिवाय तिने अनेक सिनेमांसाठी ड्रेस डिझाइन केले, त्यामध्ये शहजादे (1989), अजूबा (1991), डर (1993), रुदाली (1993), बरसात (1995), घातक (1996), चाची 420 (1998), जब प्यार किसी से होता है (1998), कसम (2001), सोचा ना था (2005)सारखे सिनेमे सामील आहेत.
कर्करोगाने झाला मृत्यू
2006मध्ये सिंपलला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोगावर उपचार चालू असतानासुध्दा तिने आपले काम चालू ठेवले. परंतु 10 नोव्हेंबर 2009 रोजी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानेली सिंपल 51 वर्षांची होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंपल कपाडियाची काही निवडक छायाचित्रे...