मुंबईः बॉलिवूडचा 'रॉकस्टार' अर्थातच अभिनेता रणबीर कपूर
आपल्या आईवडिलांसह पाली हिल स्थित बंगल्यात राहतो. त्याच्या या बंगल्याचे नाव 'कृष्णा-राज' आहे. 1980 मध्ये हा बंगला रणबीरचे आजोबा दिवंगत राज कपूर यांनी शास्त्रज्ञ होमी सेठ यांच्याकडून खरेदी केला होता. या बंगल्याचा इतिहास खूप जुना आहे. असे म्हटले जाते, की एकेकाळी हा बंगल्या इंग्रजांच्या ताब्यात होता. होमी सेठ यांनी हा बंगल्या खरेदी केला होता. ऐंशीच्या दशकात या बंगल्यात मोठमोठ्या पार्ट्या होत असल्याचे सूत्रांकडून समजते.
दिवंगत राज कपूर पत्नीसोबत राहायचे या बंगल्यात...
दिवंगत राज कपूर यांनी होमी सेठकडून हा बंगला खरेदी केला होता. पत्नी कृष्णा कपूर यांच्यासोबत राज कपूर अनेक वर्षे येथे वास्तव्याला होते. राज कपूर यांच्या निधनानंतर या बंगल्याचे नाव 'कृष्णा-राज' असे ठेवण्यात आले होते.
वर्तमानात 55000 रु प्रती चौ. फूट आहे जमीनीचा भाव...
'कृष्णा-राज' हा बंगला मुंबईतील पाली हिल या पॉश एरियात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे सध्या जमीनीचा भाव 55 हजार रुपये प्रती चौ. फूट इतका आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रणबीर कपूरच्या बंगल्याची खास छायाचित्रे...