आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस सईचा अॅक्शन अवतार, गिरवतेय बॉक्सिंगचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सध्या तिच्या आगामी 'प्यारवाली लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती हटके रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिचा अॅक्शन अवतार बघायला मिळणार आहे.
या सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी सध्या सई बॉक्सिंगचे धडे गिरवत आहे. यासाठी मुज्तबा कमाल तिला ट्रेनिंग देत आहेत. भूमिकेसाठी सई किस-बॉक्सिंगचे धडे गिरवत आहे. या सिनेमात सईसह अभिनेता स्वप्निल जोशी स्क्रिन शेअर करणार आहे.
बॉक्सिंगविषयी सई म्हणते, ''फिट राहण्यावर माझा विश्वास आहे. हा केवळ एक खेळ नाहीये, तर फिट राहण्याचे एक चांगले माध्यम आहे. सध्या मुले टीव्ही आणि कॉम्प्युटरमध्ये बिझी असतात. मात्र किक-बॉक्सिंगमुळे ते स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट ठेऊ शकतात.''
‘दुनियादारी’च्या ग्रँड यशानंतर ड्रीमिंग 24 बाय 7 आणि एसटीवीच्या बॅनरखाली एक नवा विषय घेऊन संजय जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दोघांची हिट जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत असून ऊर्मिला कानेटकर आणि नागेश भोसले एका स्वतंत्र भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी आणि चिन्मय मांडलेकर हेदेखील या टीममध्ये पाहायला मिळतील. 2 ऑक्टोबर 2014 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉक्सिंगचे धडे गिरवणा-या सईची खास छायाचित्रे...