आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separation For Anushka And Virat On Valentine's Day

विराटसोबत व्हॅलेंटाइन-डे सेलिब्रेट करू शकणार नाही अनुष्का, नियमांनी वाढवला दूरावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- विराट कोहली आणि अनुष्का शर्मा)
मुंबई- सध्या सर्वाधिक चर्चेत कपल्सपैकी एक अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसाठी यावर्षीचा व्हॅलेंटाइन डे निश्चितच खास असणार आहे. मात्र बातमी आहे, की हे स्टार्स हा प्रेमाचा दिवस एकत्र घालवणार नाहीये. कारण बीसीसीआयच्या नियमांनुसार, खेळाडू टूर्सदरम्यान आपली पत्नी किंवा प्रेयसीला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. 14 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपसुध्दा सुरु होत आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये व्यस्त राहणार आहे. अर्थातच विराट कोहलीसुध्दा अनुष्कापासून दूर राहणार आहे.
एवढेच नव्हे, दोघे जवळपास दीड महिना एकमेकांना भेटणार नाहीत. वर्ल्ड कप 14 फेब्रुवारी 29 मार्चपर्यंत चालणाक आहे. यावेळी अनुष्का स्टेडिअममध्ये जाऊन सामने पाहू शकते आणि विराटला चिअरअप करू शकते. परंतु त्याच्यासोबत राहू किंवा फिरू शकत नाही. अनुष्काशी संबंधीत एका जवळच्या सूत्राने सांगितले, अनुष्का बोर्डाने नियमांचा सन्मान करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लव्ह-बर्डची सोबतची छायाचित्रे...